‘शंभूराजे मनामनात… शंभू जयंती घराघरात’ उपक्रमाचे सोलापूरमध्ये उद्घाटन
सोलापूर : शिवभक्तांच्या एकतेचे प्रतीक ठरलेल्या
‘शंभूराजे मनामनात… शंभू जयंती घराघरात’ या उपक्रमाचे यंदाच्या वर्षी उत्साहात
उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून शिवपुत्र धर्मवीर छत्रपती
संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने
सातत्याने राबविला जात आहे. यंदाच्या उपक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी
अभिजीत पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, लोकमतचे उपसंपादक राकेश
कदम, नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर
तसेच आप्पा सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मध्यवर्ती
महामंडळाचे संस्थापक रामभैय्या जाधव, उत्सव अध्यक्ष रोहित
नलवडे, कार्याध्यक्ष सॅम बिराजदार, तसेच
आनंद कोलारकर, विरेश कलशेट्टी, अजिंक्य
शिंदे, सागर गायकवाड, अमित जाधव आदी
मान्यवर उपस्थित होते.
यंदा १४ मे रोजी सर्व शिवशंभू भक्तांनी आपल्या घराघरात छत्रपती
संभाजी महाराज यांची जयंती उत्साह, अभिमान आणि जल्लोषात साजरी करावी,
असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. “प्रत्येक
घरात शंभूराजांचा गौरव, प्रत्येक मनात स्वाभिमानाची ज्वाला”
या संदेशातून समाजात एकात्मता आणि प्रेरणा निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश
असल्याचे आयोजकांनी सांगितले.